Saturday, September 21, 2024
Homeआपले दादरबाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकांचे घर

बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकांचे घर

दादर मध्ये जन्मेलेल्या आणि राहिल्या महापुरुष यांच्या मुळेच मी दादरला जन्मल्याचा अभिमान वाटतो . दादरच्या करिअर मध्ये , होय दादर ला हि एक करिअर आहे त्या करिअर मध्ये अनेक लोकांचे पदव्या आहे . ” साहित्यीक दादर ” म्हणवले गेलेली ओळख आता केवळ राजकीय दादर पर्यंत येऊन ठेपली आहे ,पण दादर त्याहुन अधिक वेगळे आहे .

द्वारकानाथ संझगिरी म्हणता ना कि “दादर हे निव्वळ मुंबईच्या एका विभागाचे नावं नाही. हे एका संस्कृतीचं नाव आहे “

त्यांनी म्हटलेले हे वाक्य जेवढं सत्य आहे तेवढंच त्याचे मोल कमी होतांना दिसत आहे , कारण दादरकरच नाही तर मुंबईतील अनेकांना या अनेक गोष्टींचा विसर पडला आहे हा विसर संस्कृती विसरण्याचा मार्गावर आज आहे.

हेही वाचा: श्री स्वामी समर्थ मठ (shree swami samrtha math)- दादरमधील १०० वर्षांहून जुने मठ

याच अश्या दादर मध्ये परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे.  मी याला निवास स्थान नाही म्हणणार कारण हे आहे ” पुस्तकांचे घर ” तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल बाबासाहेबांनी केवळ पुस्तके ठेवण्यासाठी हे घर बांधले होते.  १९३० मध्ये त्यांनी दादरच्या पुर्वेला ९९ आणि १२९ क्रमांकांचे प्लॉट विकत घेतले होते यापैकी १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर आपल्या कुटुंबीयांबरोबर राहण्यासाठी इमारत बांधण्याचं त्यांनी ठरवलं. १९३१ च्या जानेवारी महिन्यात १२९ क्रमांकाच्या जागेवर इमारत बांधायला सुरुवात केली आणि १९३३ मध्ये पूर्ण केले. ९९ क्रमांकाच्या जागेवरील बांधकाम १९३२ मध्ये सुरू झालं. ते पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या इमारतीचं ‘चार मिनार’ असं नाव ठेवलं.

बाबासाहेब

बाबासाहेबांना वाचनाची खूप आवड होती. ग्रंथखरेदी आणि इतर गोष्टींमुळे झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी त्यांनी चार मिनार ही इमारत विकली, मात्र राजगृहराजगृह ही वास्तू त्यांनी कायम आपल्याकडे ठेवली. बाबासाहेबांकडे पुस्तकं, ग्रंथांचं खूप मोठं भांडार होतं केवळ ते ठेवण्या करिता हे घर त्यांनी उभे केले ” दादर स्थानकापासून पूर्वेला अवघ्या पाच मिनिटांवर असलेली हिंदू कॉलनी त ” राजगृह ” नावाची निळीपाटी दिसते आणि त्या मागे पांढऱ्या रंगाची दुमजली इमारत म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं “पुस्तकांचे घर ” होय .. 

बाबासाहेब

मी इथे कित्येक वेळा आलोय , ते फक्त त्यांचे ” ग्रंथालय पाहाण्यासाठी ” त्यांचं पुस्तक ठेवायचं विशिष्ट, अर्धवर्तुळाकार कपाट आणि त्यातली पुस्तकं पाहून बाबा साहेब समोर बसल्याचा भास हा होतोच ..आज तो कपात आणि काही पुस्तक तिथे लोकांना पाहण्यासाठी ठेवली आहे बाकी सारी पुस्तके चेतना कॉलेज आणि
“Asiatic Society Library” इथे लोकांना वाचनासाठी उपलब्ध आहेत ..

मला विचाराल तु बाबासाहेब यांच्या कडून काय शिकलात तर माझं उत्तर एकच असेल आणि आहे ” शिकत राहणे “

#ज्ञानदिवस

आमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा. 

Most Popular

Recent Comments