दादर मध्ये जन्मल्याचे मी केवढा नशिबवान आहे याची सहस्त्र कारणे मी देऊ शकतो … ( सावरकर सदन )
मुंबईला metro city म्हणतात म्हणता आपण मुंबईचे मुळच नष्ट करतो , आज अश्या कित्येक वास्तू ” कमी ” होत आहे ,
पार पार इतिहास नव्हे ओ ,स्वातंत्र्यमधील अनेक आणि असंख्य घटना ता मुंबईने ” पाहिल्या आणि झेलल्या ” आहेत ..
याच अश्या दादर मध्ये ” स्वातंत्र्यवीरांचे ” घर आहे हे कित्येक जण विसरलेलच दिसतात … छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते.
अहो “दादर ” हे वेगळे आहे ओ ..
छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या कट्टया व्यतिरिक्त अनेक ” प्रेरणा ” देणारे ठिकाण याच परिसरात आहेत . छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या इमारतींना त्यांच्या लौकिकासह इतिहास आणि सांस्कृतिक पाश्र्वभूमी आहे.
आज स्वातंत्र्यवीरांची पुण्यतिथी
खर तर महापुरुष फक्त ” जन्म – मृत्यू ” पुर्ते आठवावे , हे मला कधीच आवडत नाही ..
त्याच्या कडून कित्येक गोष्टी शिक्यासारख्या आहेत . ” त्यांनी केलं ” हे दाखले आपण देतो .हे दाखले देणेच बंद केले पाहिजे …
पुलंनी एकदा सावरकरांना ” महाकवी ” ही उपाधी दिली होती ,ती का दिली याची जाणीव त्यांची कविता वाचतांना होते ……
मी सावरकरांना काधिच एक साच्या यामध्ये पाहिलेले नाही ,त्याची ” विचारांची ” गती ही येणाऱ्या कित्येल पिढीला प्रेरणाच देणारी आहे …
आज त्यांच्या पुण्यतिथी निम्मित त्याच्या राहत्या घरी जाऊन आलो ,
शांत वातावरण असलेलं हे सदनात अनेक मोहिमेची आखणी झाली होती ..त्यांनी वापरलेले कपडे ,छत्री , चष्मा, चडी त्यांना दिलेली प्रमाणपत्रे अशे कित्येक साहित्य अतिशय सुंदर पद्दतीने जतन केलेले आहे …
ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे.
सावरकरांचे या इमारतीत सुमारे २८ वष्रे वास्तव्य होते. स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या वास्तूचे एकदा तरी दर्शन घ्यावेच! छत्रपती शिवाजी महाराज पार्क च्या हाकेच्या अंतरावर असलेले हे ” सावरकर सदन ” जमेल तेंव्हा नक्की पहा …
शेवटी असे ” महापुरुष ” आपल्या देशाला मिळाली हेच आपले भाग्य ..
-नितीन पाटोळे #पाटोळेम्हणे
हेही वाचा :
शिवाजी पार्क – क्रिकेट म्हणजे दादर आणि दादर म्हणजे क्रिकेट..!!
अमर हिंद मंडळ – अखंडितपणे ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करणारी एकमेव संस्था