Saturday, September 21, 2024
Homeआपले दादरदादर मधील १०० वर्षांहून जुने श्री स्वामी समर्थ मठ

दादर मधील १०० वर्षांहून जुने श्री स्वामी समर्थ मठ

दादर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा श्री सद्ग़ुरु बाळ्कॄष्ण महाराज सुरतकर यांनी स्थापन केलेला मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा दादर येथील श्री स्वामी समर्थ मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो. श्री सद्ग़ुरु बाळ्कॄष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला.

महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत इतक्या लांबुन शनिवारी रात्री ते ही त्याकाळात मालाडला भजनास येणे हे गैरसोयीची असल्याने महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकाणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल, असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला. त्यांना एक बंगला सापडला तो भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले,”काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्त्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा.”  वरील मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला.

हेही वाचा – बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकांचे घर

 दादर Swami Samarth Math Dadar West
Swami Samarth Math Dadar West

दादर येथील मठाची स्थापना

भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या श्री स्वामी समर्थ मठाचे स्थान आहे. सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरु केले. त्याकाळात मठ माटुंग्याला दुसऱ्या जागेत हलवणे भाग पडले. ऑगस्ट १९१३ मध्ये पुरे झाले व ३० ऑगस्ट रोजी मठ परत पहिल्या जागी आला. मठात परत आल्यावर महाराजांनी सध्याचे सिंहासन सुरतहुन कारागिर आणून तयार करविले व सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालुन त्यावर संगमरवरी लादी बसवुन समर्थांच्या फोटोची स्थापना केली. 

श्री बाळ्कॄष्ण महाराज

श्री बाळ्कॄष्ण महाराज यांचा जन्म सुरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ साली झाला. लहानपणीपासूनच त्यांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती. पुढे ते आपले चुलते शिवशंकर यांचे कडे मुंबईला शिक्षणासाठी आले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त त्यांना या गोष्टीचे दुःख झाले त्यांचे शेजारी श्री रामचंन्द्र व्यंकटेश बरडकर उर्फ़ सारस्वत ब्रांम्हण भेंडे, हे महाराजांचे गुरु “तात महाराज” श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त रहात असत. त्यांनी श्री सदगुरु बाळ्कॄष्ण महाराजांना भुलेष्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वूत्तीमध्ये आमुलाग्र फ़रक केला गेला व त्याचक्षणी माहाराजांनी श्री तातमाहाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त बनले.

 दादर Swami Samarth Math Dadar West
Shri Swami Samarth Math Dadar

महाराजांना इंग्रजी व संस्क्रूतचे उत्तम ज्ञान होते. ते शिकवण्या करत व गोकुळदास संस्क्रूत पाठशाळेत संस्क्रूतचे मस्तर होते. त्यावेळी ते मस्तर या नावाने ओळखले जात जांभुळ्वाडीत महाराजांचे शेजारीच धोत्रे नावाचे कुटुंब रहात असे. त्या कुटुंबातील पिशाच्चबाधा महाराजांनी दुर केली व तेंव्हापासुन हे साधे ’मास्त्तर’ नसुन एक दिव्य महात्मे आहेत याची ओळख लोकांना झाली.

भजनास येणा-या भक्त्तांची गर्दी

बंगल्यात मठ आल्यावर दर्शनास व भजनास येणा-या भक्त्तांची गर्दी फारच होऊ लागली. गॅसबत्त्यांमुळे प्रकाशाचा झगझगाट होऊन रात्री रंम्य व शोभिवंत दिसू लागले. रिवाजानुसार लांबून येणा-या भक्तांसाठी गुरुवार-शनिवार आरती रात्री १० ला सुरु होऊन ११-३० ला संपे. त्यानंतर महाराज, हल्ली महाराजांचे छायाचित्र आहे तेथे आरामखुर्चीत बसत. अर्धा एक तास भक्तजनांचे महाराजांना हार घालणे चाले. हार इतके येत की, तीन-तीन वेळा काढून ठेवावे लागत. त्यानंतर महाराज गुजराथी असुनसु्द्धा मराठीत एकनाथी भागवतावर रात्री दोन वाजेपर्यत प्रवचन करीत. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येई. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे.

दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत येथे सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांचा पलंग श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभार्यात ठेवलेली आहे.  

आमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा. 

हेही वाचा- ग्रेटव्यक्ती – मुंबईच्या अनेक दिग्गजांना भुरळ पाडणारा ‘दादरचा बबन चहावाला’

Most Popular

Recent Comments