दादर मुंबईकर हे दादर आणि मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे एक हक्काचे असे ठिकाण आहे.
दादर आणि मुंबईच्या धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहासाविषयी, दादरमधील कला आणि क्रीडा क्षेत्राविषयी, दादर मधील ग्रेट व्यक्तीं विषयी, दादरला लाभलेल्या खाद्य संस्कृती विषयी, दादर मधील प्रेक्षणीय स्थळे आणि लुप्त होत जाणाऱ्या चाळ संस्कृती विषयी माहिती देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
तसेच आपल्या दादर मुंबई मधील लोकांना उद्योग धंद्यात पाठींबा देण्यासाठी, प्रोत्साहीत करण्यासाठी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करतो. दादर मधे होणाऱ्या विविध सामाजिक कार्यांमध्ये आमचा सहभाग असतो. दादरविषयी किंवा दादर मधे होणाऱ्या नाटक, सिनेमा, शॉर्टफिल्म इत्यादीचे तसेच कमर्शिअल स्टार्टअप, कमर्शिअल इव्हेंट चे प्रमोशन देखील आम्ही करतो.